नमस्कार मंडळी,
अनेक वर्ष डोंगर दऱ्या, जंगले तसेच अनेक रमणीय ऐतिहासिक स्थळे फिरता फिरता हे सारेच निसर्ग वैभव छायाचित्रणात बंदिस्त करावेसे वाटले. मी पाहिलेल्या ह्या निसर्ग ठेव्यांचा उपयोग इतरांस व्हावा तसेच माझ्या छंदाचा वापर त्यांना व्यावसाईक दृष्टीने करता यावा ह्यासाठीच "स्वयेश्री" चा जन्म झाला. स्वयेश्रीचे मूळ भाग सात असुन ते खालील प्रमाणे आहेत. साधारण रू.500/- ते रू.5000/- हया दरांमध्ये उपलब्ध असलेले माझे सर्व छायांकन (फोटो) आपल्या पसंतीला उतरतील अशी मी आशा करतो.
स्वयेश्रीचे मूळ भाग सात असुन ते खालील प्रमाणे आहेत.
1. Animals
2. Arts
3. Birds
4. Flora
5. Sceneries
6. Wild
आणि
7. स्वयेश्री क्रमणिका

प्रथम सहा विभाग हे निव्वळ छायाचित्रणाचे असुन सातवा विभाग हा माझ्या स्वरचित शब्दफुलांचा आहे. छायाचित्रणाप्रमाणेच काव्यलेखन हे ही माझ्या जीवनाचे एक अंग आहे. आजवर मी जशी अनेक विषय विचारात घेऊन अनेक सजीव सृष्टीची छायाचित्रे काढली तसेच मी अनेक विषय विचाराधीन करून काही उत्तम रचनांची निर्मिती केली आहे. वाचकांस माझा हा सर्व प्रपंच निश्चितच आवडेल ह्यात मला अजिबात शंका वाटत नाही. वस्तुत: माझी चित्रे आणि काव्य; मी व्यावसायिक रुपात सर्व वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहे. इच्छुक वाचकांना जे हवे असेल किवा त्यांच्या इच्छेनुसार एखादे चित्र अथवा गाणे हवे असेल तर ते माझ्याकडून सहज उपलब्ध होऊ शकते. आपण सर्वजण जाणकार आहात तसेच आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्यरत आहात . आपली गरज आणि माझी उपलब्धता ह्यांचा मिलाफ होऊन काही सकारात्मक कार्य निर्माण होऊ शकते असे मला मनोमन वाटत आहे.
आपला नम्र,